Friday, August 16, 2013

घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे (GHEI GHEYI MAJHE VACHE | GOD NAAM VITHOBACHE)



घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे || १ ||

डोळे तुम्ही घ्यारे सुख | पाहा विठोबाचे मुख || २ ||

तुम्ही आइका रे कान | माझ्या विठोबाचे गुण || ३ ||

मन तेथे धाव घेई | राही विठोबाचे पायी || ४ ||

तुका म्हणे जीवा | नको सोडू या केशवा || ५ ||

नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी (NAAM GHETA UTHAUTHI, HOY SANSARACHI TUTI)



नाम घेता उठाउठी,
होय संसाराची तुटी || धृ ||

ऐसा लाभ बांधा गांठी
विठ्ठल पायी मिठी  || १ ||

नामापरते साधन नाही
जें तू करिसी आणिक कांही || २ ||

हाकरोनी सांगे तुका
नाम घेता राहो नका || ३ ||

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी (SUNDAR TE DHYAN UBHE VITHEVARI)



सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटेवरी ठेवूनिया || धृ ||

तुळशी हार गळा कासे पितांबर
आवडे निरंतर हेचि ध्यान || १ ||

मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजित || २ ||

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्री मुख आवडीने || ३ ||

आता बोला मुखाने हरि नाम | जय जय राम (AATA BOLA MUKHANE HARI NAAM | JAY JAY RAAM)


आता बोला मुखाने हरि नाम जय जय राम
आता बोला मुखाने जय जय राम, जय जय राम जय जय राम
आता तरी बोला मुखाने जय जय राम || धृ ||

राम नामाने वाल्या कोळी तरला, वाल्याचा वाल्मीकी झाला
ऐसे हरिनामाचे काम.... जय जय || १ ||

राम नामाने आवडीत घडले, पाण्यावरती पाषाण तरले
ऐसे हरिनामाचे काम...... जय जय || २ ||

एकाजनार्दनी राम नाम, उद्धरिले भाविकात
ऐसे हरिनामाचे काम ..... जय जय || ३ ||

आवडे हे रूप गोजिरे सगुण (AAVADE HE RUP GOJIRE SAGUN)


आवडे हे रूप गोजिरे सगुण
पाहता लोचन सुखावले || धृ ||

आता द्रूष्टी पुढे एसाची तू राहे
जो मी तुज पाहे वेळोवेळा || १ ||

लाचावले मन लागलीस गोडी
ते जीव न सोडी ऐसे झाले || २ ||

तुका म्हणे आम्ही मागावे लडिवाळी
पुरवावी आळी माय बाप || ३ ||

Wednesday, August 14, 2013

देखोनिया तुझ्या रूपाचा आकार (DEKHONIYA TUJHYA RUPACHA AAKAR)


देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
उभा कटीकर ढवोनिया || धृ ||

तेणे माझ्या चित्ती झाले समाधान
वाटते चरण ण सोडावे || १ ||

मुखी नाम गातो वाजवितो टाळी
नाचत राहुली प्रेमे सुख || २ ||

तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे
तुच्छे हे बा पुढे सकळही || ३ ||

रूप सावळे सुंदर (RUP SAVALE SUNDAR)


रूप सावळे सुंदर
गळा शोभे तुलसी हार || धृ ||

तो हा पंढरीचा राणा
नकळे योगियांच्या ध्याना || १ ||

पिवळा पितांबर वैजयंती
माया मुकुट शोभे किती || २ ||

एकाजनार्दनी ध्यान
विठे पाऊले समान || ३ ||

तुझे रूप पाहता देवा, सुख झाले माझ्या जीवा (TUJHE RUP PAHATA DEVA, SUKH JHALE MAJHYA JIVA)


तुझे रूप पाहता देवा
सुख झाले माझ्या जीवा || धृ ||

हे तो वाचे बोळवेना
काय सांगू नारायणा || १ ||

जन्मो जन्मीचे सुकृत
तुझे वाई रम्मे चित्त || २ ||

जरी योगाचा अभ्यास
तेव्हा तुझा निजध्यास || ३ ||

तुका म्हणे भक्त
गोड गाऊ हरीचे गीत || ४ ||

भगवा झेंडा फडकवीत आला आला (BHAGAVA JHENDA FADAKVIT AALA AALA)


भगवा झेंडा फडकवीत आला आला
जय जय राम कृष्ण राम कृष्ण बोला || धृ ||

अयोध्येचा राम राजा झाला
पितृवचनासाठी वनवास भोगीयेला || १ ||

गोकुळात कृष्ण जन्म झाला
कंस मामाचा हो वध त्याने केला || २ ||

जिजाइच्या पोटी शिव जन्मला
हिंदवी स्वराज्य हो स्थापन त्याने केला || ३ ||