Wednesday, December 17, 2014

स्वामी कृपा कधी करणार (Swami Krupa Kadhi Karanar)


स्वामी कृपा कधी करणार स्वामी कृपा कधी करणार 
तव चरणांचे दर्शन आता मला कधी घडणार ll धृ ll 

मी अपराधी पापी तापी अहंकार युत अन संतापी 
दीन पतीत या तव बाळाला उरी कधी धरणार ll ll


मद मदनाची जोडी नामी व्यवहारी मन जडले कामी
अज्ञानाचा तिमिर हराया सूर्य कधी बनणार ll ll

स्वामी राया ,माझी काया आतुर झाली,तुम्हा पहाया
याया आता उशीर कासया दर्शन कधी देणार ll ll

Friday, December 5, 2014

निघालो घेवून दत्ताची पालखी.... (Nighalo Ghevun Dttachi Palakhi.....)




निघालो घेवून दत्ताची पालखी
आम्ही भाग्यवान आनंद निधान, डुलते हळूच दत्ताची पालखी || धृ ||

रत्नाची आरास साज मखमलीची
त्यावरी सुगंधी फुले गोड ओळी, झुळूक कोवळी चंदना सारखी || १ ||

सात जन्माचि हो लाभली पुण्याई
म्हणुनी जाहलो पालखीचे भोई, शांतमय मूर्ती पाहते सारखी || २ ||

वात वळणाची जवालागे ओढी
दिसते समोर नरसोबाची वाडी, दोलीयात गंगा जाहली बोलकी || ३ ||

दत्त दर्शनाला जायचं जायच.... (Datta Darshanala Jayach Jayach.....)




दत्त दर्शनाला जायचं जायचं
आनंद पोटात माझ्या मावेना || धृ ||

गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ता ची भेट
या या डोळ्याची हौस पुरी होईना होईना || १ ||

रूप सावळे सुंदर गोजिरवाणी मनोहर
या या नजरेस आणि काही येईना || २ ||

रुती नाथ पांडुरंग दत्त गारुडी अभंग
या भजनाची हौस पुरी होईना होईना || ३ ||

नजर बंदीचा हा खेळ, खेळे सदगुरू प्रेमळ
खेळ खेळीता खेळ पुरा होईना || ४ ||

प्राणीयासी मंत्र सोपा, दत्त दत्त वाचे जपा..... (Praniyasi Mantra Sopa, Datta Vache Japa...)



प्राणीयासी मंत्र सोपा, दत्त दत्त वाचे जपा || धृ ||

आणिक गे साधन, दत्त नामे घडे ज्ञान || १ ||

न लगे योग याग पट्टी, दत्ता वाचुनी नेणे काही || २ ||

एका जनार्दनी वेधले मन, मन हे झाले उन्मन || ३ ||

ब्रम्हा विष्णू आणि महेश, सामोरी बसल.... (Brahma Vishnu Aani Mahesh, Samori Basale....)



ब्रम्हा विष्णू आणि महेश, सामोरी बसले
मला हे दत्त गुरु दिसले || धृ ||

माय उभी हि गाय होवुनी, पुढे वासरू पाहे वळूनी
कृतज्ञेतेचे श्र्वान बिचारे पायावर झुकले || १ ||

चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटा मधुनी हृदय पाखरू, स्वानंद फिरले || २ ||

तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्या भवती, औदुंबर बसले || ३ ||

जनार्दनाचा गुरु हो, स्वामी दत्तात्रय माझा..... (Janardanacha Guru Ho, Swami Dttatreya Majha....)



जनार्दनाचा गुरु हो, स्वामी दत्तात्रय माझा || धृ ||

त्याने उपदेश केला, केला ... स्वानंदाचा बोध दिला || १ ||

पतित सुखाचा अनुभव, दाखविला स्वयंमेव || २ ||

एका जनार्दनी दत्त दत्त, बसे माझ्या हृदयात || ३ ||

नमन माझे गुरुराया.... (Naman Majhe Gururaya...)






नमन माझे गुरुराया |
महाराजा दत्तात्रया || धृ ||


तुझी अवधूत मूर्ती 
माझ्या जीवीची विश्रांती || १ ||

माझ्या जीवीचे साकडे
कोण निवारील कोडे कोडे || २ ||

माझ्या अनुसूया सुता
तुका म्हणे पाव आता || ३ ||

Thursday, September 25, 2014

आईचा गोधऴ ...........




आई उदे गं...उदे गं....
उदे गं ......अंबाबाई..


आई भवानी.. तुऴजापूरची
अंबाबाई .. कोल्हापूरची..!!घ्रु!!


वाघावर  स्वार अंबिका झाली
सिंहावर बैसोनी भवानी आली
कोंबड्यावरुन दुर्गा निघाली
नंदिची फेरी उमानं केली
ज्योत पेटवली हरहरची..!!१!!


महाकाली रुप उग्र ते फार 
घेऊनी आली आई अवतार
आपल्या भक्तांचा करण्या उद्धार
ज्योत पेटवली हरहरची..!!२!!


पंचमहाभूतं  चरणावर येती
शिव ब्रम्हा विष्णु दर्शन घेती
जन्म मरण सारं आईच्या हाती
ज्योत पेटवली हरहरची..!!३!!


सप्तश्रुंगीवणी नाशिकची खास
डोंगरात एकवीरा करते निवास 
जत्रेला जा वो म्हणे शनिदास
ज्योत पेटवली हरहरची..!!४!! 


बोला ....अंबे माते कि ..जय !!

Friday, July 11, 2014

आषाढी एकादशी दिंडी सोहळा - २०१४ (विरार ते चर्चगेट - दिंडी सोहळा )

Get Adobe Flash player
Photo Gallery by QuickGallery.com

पाऊली चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची गांठ


पाऊली चालती पंढरीची वाट,
सुखी संसाराची गांठ || धृ ||

गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने,
पडता रिकामे भाकरीचे ताट || १ ||


आत्पइष्ट सारे, सगेसोयरे ते,
पाहुनिया सारे फिरविती पाठ || २ ||


घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा,
अशा दारिदर्याचा व्हावा नायनाट || ३ ||


मन शांत होता पुन्हा लागे ओढ,
तैसा परी गोड संसाराचा थाट || ४ ||

या पंढरपुरात काय वाजत गाजत


या पंढरपुरात काय वाजत गाजत
सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत.... || धृ ||


राज्या भिमकाची होती रुक्मिणी उपवर लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर
टाळ मृदुंग ही कीर्ती हर्षाने वाजती ... || १ ||


राजा भिमकाज्या होत्या नऊ जनी कन्या
धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्यावाण्या
पायी जोडविला मोती नवलाख साजत.... || २ ||


नवलाख मोती विठुरायाच्या कळसाला चढता उतरताना गवंडीदादा हरपला
सांगतो भीमका माझ लेकीच हाय नात ..... || ३ ||

Friday, April 18, 2014

देव माझा विठू सावळा (Dev Majha Vithu Savala)



देव माझा विठू सावळा

माळ त्याची माझिया गळा..... || धृ ||

विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी,
भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळ..... || १ ||

साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर
कंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा.... || २ ||

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो
रांगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा..... || ३ ||

यारे नाचू प्रेमानांदे, विठ्ठल नामाचिया छंद (YARE NACHU PREMANANDE, VITHTHAL NAMACHIYA CHAND)



यारे नाचू प्रेमानांदे, विठ्ठल नामाचिया छंद || धृ ||


जाऊ म्हणती पंढरीची वाटे, कळीकाळा भयं वाटे || १ ||

चंद्रभागे घडले स्नान, याम लोकी पडली हान || २ ||

झाली पुंडलिक भेटी, पूर्वज आनंदले वैकुंठी || ३ ||

आता राऊळासी जाता, झाली जीवाची मुक्तता || ४ ||

विष्णुदास नामा म्हणे, आता नाही येणे जाणे || ५ ||

Monday, April 14, 2014

धरीला पंढरीचा चोर | गळा बांधुनिया दोर.... (Dharila Pandharicha Chor, Gala Bandhuniya Dor.........)


धरीला पंढरीचा चोर | गळा बांधुनिया दोर || १ ||


हृदय बंदिखाना केला | आंत विठ्ठल कोंडीला || २ ||

शब्दे केली जडाजुडी | विठ्ठल पायी घातली बेडी || ३ ||

सोहम शब्दाचा मारा केला | विठ्ठल काकुळती आला || ४ ||
जनी म्हणे बा विठ्ठला | जीवे न सोडी मी तुजला || ५ ||