Wednesday, January 22, 2014

दुसरे शिवाजी होवून गेले बाळासाहेब ठाकरे (DUSARE SHIVAJI HOVUN GELE BALASAHEB THAKARE)



हिंदूहृदयसम्राट ” मराठी मनाचा केंद्रबिंदू महाराष्ट्रातील युवा मनाला साद घालणारे, व्यंग्यचित्राच्या माध्यमातून, देशातील तमाम राजकारण्यांना आसूड ओढणारे, सामान्य माणसाला रावाचा रक करणारे, हिंदुत्वाची कास धरणारे, राष्ट्राविषयी कडवटपणा अंगी असलेले, हिंदूहृदयसम्राट मा. श्री स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसा निम्मित विनम्रतापूर्वक अभिवादन ......!!

हिंदूधर्माच्या रक्षणासाठी दिला वैऱ्याना धाक रे
दुसरे शिवाजी होवून गेले बाळासाहेब ठाकरे || धृ ||

शिवरायाचा लढावु बाणा, रुजविला कणाकणात,
चैतन्याचा प्रकाश पाडीला, साऱ्यांच्या मनामनात,
बोलणे त्यांचे ते रोख ठोक, विचार त्यांचे ज्वलंत,
शिवसेना ही चार अक्षरे, वसविली जना जनात,
जय हिंद जय महाराष्ट्र, दिला भगव्याचा धाक रे || १ ||

महाराष्ट्राचे एकच वाघ, इतिहास रचिला नवा नवा
शिवतिर्थावर बाळासाहेबाचा, भव्य स्मारक हवा हवा
बॉम्बे ची ही मुंबई केली, महाराष्ट्राची शान रे || २ ||

झाले नाही होणार नाही, कीर्ती गातील पोवाडे,
मुख्य मनाने किती उधळावे शब्दांचे हे बुडबुडे,
काय झाला सांगा हा गुन्हा, महाराष्ट्र केला सुना सुना,
पोरके का केलेत आम्हा, जन्म घ्यावा पुन्हा पुन्हा,
आठवण येता सचिन सांगे, हृदय माझे पाझरे || ३ ||

Wednesday, January 15, 2014

येग येग विठाबाई (YEG YEG VITHABAI)


येग येग विठाबाई, माझे पंढरीचे आई || धृ ||

भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा || १ ||

इतुक्यासाहित त्यां बा यावे, माझे रंगणी नाचावे || २ ||

माझा रंग तुझे गुणी, म्हणे नामयाची जनी || ३ ||

Wednesday, January 8, 2014

इंद्रायणी कांठी देवाची आळंदी (INDRAYANI KATHI DEVACHI ALANDI)


इंद्रायणी कांठी देवाची आळंदी | लागली समाधी ज्ञानेशाची || धृ ||

ज्ञानियांची राजा भोगतो राणीव | नाचती वैष्णव मांगे पुढे || १ ||

मागे पुढे दाते ज्ञानाचा उजेड | अंगणात झाड कैवल्याचे || २ ||

उजेडी राहिले उजेड होऊन | निवृत्ती सोपान मुक्ताबाई || ३ ||

माऊली च मूर्ती विठ्ठलाची (MAVULI CH MURTI VITHTHLACHI)


माऊली च मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || धृ ||

काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा

डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला

अभंगाला जोड टाळ चिपळ्याची, माऊली च मूर्ती विठ्ठलाची || १ ||

लेकरांची सेवा केलीस तू आई, आs s s लेकरांची सेवा

कस पांग फेडू कस होवू उतराई, तुझ्या उपकारा जागी तोड नाही

ओवाळीन जीव माझा सावळे विठ्ठाई, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची

माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू..... || २ ||

येग येग विठाबाई (YEG YEG VITHABAI)


येग येग विठाबाई, माझे पंढरीचे आई || धृ ||

भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा || १ ||

इतुक्यासाहित त्यां बा यावे, माझे रंगणी नाचावे || २ ||

माझा रंग तुझे गुणी, म्हणे नामयाची जनी || ३ ||

उस डोंगा परी रस नोहे डोंगा ( US DONGA PARI RAS NOVHE DONGA )


उस डोंगा परी रस नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || १ ||

कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || २ ||

नदी डोंगी परी जल नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || ३ ||

चोख डोंगी परी भाव नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || ४ ||

तुझा माझा करे वैराकर देवा ( TUJHA MAJHA KARE VAIR KA RE DEVA )


तुझा माझा करे वैराकर देवा | दुःखाचे डोंगर दाखविसी || १ ||

बळे बांधोनिया देशी काळाहाती | ऐसे काय चित्ती आले तुझ्या || २ ||

आम्ही देवा तुझी केली होती आशा | बरवे ऋषिकेश काळो आले || ३ ||

नामा म्हणे देवा करा माझी कीव | नाही तरी जीव माझा घ्याव्या || ४ ||

आता कोठे धावे मन (AATA KOTHE DHAVE MAN)


आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले आज || धृ ||

भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद || १ ||

प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखाशी || २ ||

तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोंगे खरे माप || ३ ||

आज सोनियाचा दिनू | वर्षे अमृताचा धनु (AAJ SONIYACHA DINU | VARSH AMRUTACHA DHANU)


आज सोनियाचा दिनू | वर्षे अमृताचा धनु || १ ||

हरी पहिला रे हरी पहिला रे |

सबाह्यअभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी || २ ||

दृढविटे मन मुळी | विराजित वनमाळी || ३ ||

बरवा संतसमागमू | प्रगटला आत्मारामु || ४ ||

कृपासिंधु करुणाकरू | बणररखुमादेवीवरू || ५ ||

वेढा वेढा रे पंढरी (VEDHA VEDHA RE PANDHARI)


वेढा वेढा रे पंढरी | मोर्चेवला भीमातीरी || १ ||

चला चला संतजन | करू देवासी भांडण || २ ||

लुटा लुटा पंढरपूर | धारा रखुमाईचा वर || ३ ||

तुका म्हणे चला चला | घाव निशाणी घातका || ४ ||

बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल (BOLAVA VITHTHAL PAHAVA VITHTHAL)


बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल | करावा विठ्ठल जीवभावे ||१||

येणे सोसे मन झाले हावभरी | परत माघारी घेत नाही ||२||

बंधनापासुनि उकलल्या गांठी | देता आले मिठी सावकाश ||३||

तुका म्हणे देह भरीला विठ्ठले | कामक्रोध केले घर रिते ||४||

आधी रचिली पंढरी | मग वैकुंठ नगरी (AADHI RACHILI HI PANDHARI | MAG VAIKUNTH NAGARI)


आधी रचिली पंढरी | मग वैकुंठ नगरी || १ ||

जेव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर 

चंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी || २ ||

जेव्हा नव्हत्या गोदा गंगा | तेव्हा होती चंद्रभागा

चंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी || ३ ||

नामा म्हणे बा श्री हरी, ते म्या देखिली पंढरी 

चंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी || ४ ||

झाला महार पंढरीनाथा (JHALA MAHAR PANDHARINATH)


झाला महार पंढरीनाथा | काय सांगू देवाची मात ||

नेसला मलीन चीघोटी | घेतला हातामधे काठी ||

घोंगडी टाकिली पाठी | करी जोहार दरबारात || १ ||

मुंडाशात बांधिली चिठ्ठी | फेकीतो दुरुनी जगजेठी ||

दामाजीने विकली जी कोठी | त्यांचे दाम घ्यावे पदरात || २ ||

खळखळा ओतिला मोहरा | त्याची मोजून पावती करा ||

ढीग बघून चमकल्या नजरा | शहा घाली बोट तोंडात || ३ ||

देवा तुझा मी सोनार (DEVA TUJHA MI SONAR)


देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार ..... || १ ||

मन बुद्धीची कातरी, राम नामे सोने चारी || २ ||

नरहरी सोनार हरीचा दास, भजन करितो रात्रंदिवस || ३ ||

सुखाचे हे नाम आवडीने गावे (SUKHACHE HE NAAM AAVADINE GAAVE)


सुखाचे हे नाम आवडीने गावे

वाचे आळवावे विठोबासी || धृ ||

संसार सुखाचा होईल निर्धार

नामाचा गजर सर्व काळ || १ ||

कामक्रोधाचे चलेची काही

आशा मनशा पाही दूर होती || २ ||

आवडी धरोनी वाचे म्हणे हरीहरी

म्हणतसे महारी चोखियाची || ३ ||

विठ्ठल आवडी प्रेमे भाव हो.. विठ्ठल नामाचा रे टाहो (VITHTHAL AAVADI PREME BHAV HO.. VITHTHAL NAMACHA RE TAHO)


विठ्ठल आवडी प्रेमे भाव हो.. विठ्ठल नामाचा रे टाहो

प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेमे भाव || धृ ||

तुटला हा संदेह

भव मूळ व्याधेचा, भव मूळ व्याधेचा, विठ्ठल नामाचा || १ ||

म्हणा नरहरी उच्चार, कृष्ण हरी श्रीधर,

हेची नामा आम्हा सार, म्हणा नर हरी

संसार तरावया संसार तरावया,

प्रेमे भव विठ्ठल आवडी || २ ||

नेघो नामाविण काही, विठ्ठल कृष्ण लवलाही,

नामा म्हणे तरलो पायी, विठ्ठल म्हणताची विठ्ठल,

प्रेम भव, विठ्ठल आवडी प्रेम भव || ३ ||

जन विजन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाणे (JAN VIJAN JHALE AAMHA, VITHTHAL NAMA PRAMANE)


जन विजन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाणे || धृ ||

पाहे तिकडे मायबाप, विठ्ठल आहे रखुमाई || १ ||

वन पट्टण एक भाव, अवघा ठाव सरता झाला || २ ||

आठव नाही सुख दु:खा, नाचे तुका कौतुके || ३ ||