Friday, April 18, 2014
Monday, April 14, 2014
अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर.....(Aavghe Garje Pandharpur, Chalal Namacha Gajat..........)
अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर || धृ ||
टाळ घोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती
पांडुरंगी जाहलों हो, चंद्रभागा तीर, चालला नामाचा गजर || १ ||
इडापिडा टळुनी जाती, देहाला या लाभे मुक्ती
नामरंगी रंगलो हो, संतांचे माहेर, चालला नामाचा गजर || २ ||
देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई
सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर || ३ ||
अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.....(Abir Gulala Udhalit Rang, Natha Ghari Nache Majha Sakha Pandurang.....)
अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ ||
उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीन
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्हीलीन, पायरीसी होवू दंग गावूनी अभंग || १ ||
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू
विठ्ठलाचे नाव घेवूनि निसं:ग || २ ||
आषाढी कार्तिकी भक्त जन येती साधुजन येती
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, चोख म्हणे नाम घेता भक्त होती दंग || ३ ||
विठू माऊली तू माऊली जगाची....... (Vithu Mauli Tu Mauli Jagachi...)
विठू माऊली तू माऊली जगाची
माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || धृ ||
काय तुझी माया सांगू श्रीरंगा
संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला
अभंगाला जोड टाळ चीपल्याची
माऊलीच मूर्ती विठ्ठलाची ... || १ ||
लेकरांची सेवा केलीस तू आई
आ आ आ लेकरांची सेवा
कस पांग फेडू आता कस उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळूनी जीव माझा सावळे विठ्ठाई
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलाची
माऊलीच मूर्ती विठ्ठलाची ... || २ ||
पांडुरंग पांडुरंग विठू माउली तू
कानडा राजा पंढरीचा... (Kanda Raja Pandharicha......)
कानडा राजा पंढरीचा
वेदानाही नाही कळला अंत पार यांचा .... || धृ ||
निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रगटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटीवर
पुतळा चैतन्याचा ... || १ ||
परब्रह्म हे भक्तांसाठी
उभे थकले भिमेसाठी
उभा राहिला भाव सांवयव
जणू कि पुंडलिकाचा ... || २ ||
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबाची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा
वाली दामाजीचा ... || ३ ||
माऊली च मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा.... (Mauli cha Murthi Vitthalachi, Vitthala Mayabapa.....)
माऊली च मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || धृ ||
काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला
अभंगाला जोड टाळ चिपळ्याची, माऊली च मूर्ती विठ्ठलाची || १ ||
लेकरांची सेवा केलीस तू आई, आs आs आs लेकरांची सेवा
कस पांग फेडू कस होवू उतराई, तुझ्या उपकारा जागी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठ्ठाई, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची || २ ||
Sunday, April 13, 2014
तुने मुझे बुलाया शेरा वालीये..... (Tune Mujhe Bulaya Shera Valiye...)
मै आया मै आया शेरावालीये
वो पहाडा वालीये वो ज्योतीवालीये
वो मेहरा वालीये, तुने मुझे || धृ ||
सारा जग है एक बंजारा, सबकी मंझिले तेरे द्वारा
उंचे पर्वत लंबारस्ता, उंचे पर्वत लंबारस्ता
फिर मै रहना पाया शेरावालीये || १ ||
कौन है राजा कौन भिकारी, एक बराबर सारे पुजारी
तुने सबको दर्शन देके,
अपने गले लगाया, शेरा वालीये || २ ||
सुने मनमे जल गयी बाते, तेरे पथपे मिल गये साथी
मुंह खोलू क्या तुझसे मांगु,
बिन मांगे सब पाया, शेरा वालीये || ३ ||
Subscribe to:
Posts (Atom)