Thursday, September 25, 2014

आईचा गोधऴ ...........




आई उदे गं...उदे गं....
उदे गं ......अंबाबाई..


आई भवानी.. तुऴजापूरची
अंबाबाई .. कोल्हापूरची..!!घ्रु!!


वाघावर  स्वार अंबिका झाली
सिंहावर बैसोनी भवानी आली
कोंबड्यावरुन दुर्गा निघाली
नंदिची फेरी उमानं केली
ज्योत पेटवली हरहरची..!!१!!


महाकाली रुप उग्र ते फार 
घेऊनी आली आई अवतार
आपल्या भक्तांचा करण्या उद्धार
ज्योत पेटवली हरहरची..!!२!!


पंचमहाभूतं  चरणावर येती
शिव ब्रम्हा विष्णु दर्शन घेती
जन्म मरण सारं आईच्या हाती
ज्योत पेटवली हरहरची..!!३!!


सप्तश्रुंगीवणी नाशिकची खास
डोंगरात एकवीरा करते निवास 
जत्रेला जा वो म्हणे शनिदास
ज्योत पेटवली हरहरची..!!४!! 


बोला ....अंबे माते कि ..जय !!