Wednesday, December 17, 2014

स्वामी कृपा कधी करणार (Swami Krupa Kadhi Karanar)


स्वामी कृपा कधी करणार स्वामी कृपा कधी करणार 
तव चरणांचे दर्शन आता मला कधी घडणार ll धृ ll 

मी अपराधी पापी तापी अहंकार युत अन संतापी 
दीन पतीत या तव बाळाला उरी कधी धरणार ll ll


मद मदनाची जोडी नामी व्यवहारी मन जडले कामी
अज्ञानाचा तिमिर हराया सूर्य कधी बनणार ll ll

स्वामी राया ,माझी काया आतुर झाली,तुम्हा पहाया
याया आता उशीर कासया दर्शन कधी देणार ll ll

Friday, December 5, 2014

निघालो घेवून दत्ताची पालखी.... (Nighalo Ghevun Dttachi Palakhi.....)




निघालो घेवून दत्ताची पालखी
आम्ही भाग्यवान आनंद निधान, डुलते हळूच दत्ताची पालखी || धृ ||

रत्नाची आरास साज मखमलीची
त्यावरी सुगंधी फुले गोड ओळी, झुळूक कोवळी चंदना सारखी || १ ||

सात जन्माचि हो लाभली पुण्याई
म्हणुनी जाहलो पालखीचे भोई, शांतमय मूर्ती पाहते सारखी || २ ||

वात वळणाची जवालागे ओढी
दिसते समोर नरसोबाची वाडी, दोलीयात गंगा जाहली बोलकी || ३ ||

दत्त दर्शनाला जायचं जायच.... (Datta Darshanala Jayach Jayach.....)




दत्त दर्शनाला जायचं जायचं
आनंद पोटात माझ्या मावेना || धृ ||

गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ता ची भेट
या या डोळ्याची हौस पुरी होईना होईना || १ ||

रूप सावळे सुंदर गोजिरवाणी मनोहर
या या नजरेस आणि काही येईना || २ ||

रुती नाथ पांडुरंग दत्त गारुडी अभंग
या भजनाची हौस पुरी होईना होईना || ३ ||

नजर बंदीचा हा खेळ, खेळे सदगुरू प्रेमळ
खेळ खेळीता खेळ पुरा होईना || ४ ||

प्राणीयासी मंत्र सोपा, दत्त दत्त वाचे जपा..... (Praniyasi Mantra Sopa, Datta Vache Japa...)



प्राणीयासी मंत्र सोपा, दत्त दत्त वाचे जपा || धृ ||

आणिक गे साधन, दत्त नामे घडे ज्ञान || १ ||

न लगे योग याग पट्टी, दत्ता वाचुनी नेणे काही || २ ||

एका जनार्दनी वेधले मन, मन हे झाले उन्मन || ३ ||

ब्रम्हा विष्णू आणि महेश, सामोरी बसल.... (Brahma Vishnu Aani Mahesh, Samori Basale....)



ब्रम्हा विष्णू आणि महेश, सामोरी बसले
मला हे दत्त गुरु दिसले || धृ ||

माय उभी हि गाय होवुनी, पुढे वासरू पाहे वळूनी
कृतज्ञेतेचे श्र्वान बिचारे पायावर झुकले || १ ||

चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटा मधुनी हृदय पाखरू, स्वानंद फिरले || २ ||

तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्या भवती, औदुंबर बसले || ३ ||

जनार्दनाचा गुरु हो, स्वामी दत्तात्रय माझा..... (Janardanacha Guru Ho, Swami Dttatreya Majha....)



जनार्दनाचा गुरु हो, स्वामी दत्तात्रय माझा || धृ ||

त्याने उपदेश केला, केला ... स्वानंदाचा बोध दिला || १ ||

पतित सुखाचा अनुभव, दाखविला स्वयंमेव || २ ||

एका जनार्दनी दत्त दत्त, बसे माझ्या हृदयात || ३ ||

नमन माझे गुरुराया.... (Naman Majhe Gururaya...)






नमन माझे गुरुराया |
महाराजा दत्तात्रया || धृ ||


तुझी अवधूत मूर्ती 
माझ्या जीवीची विश्रांती || १ ||

माझ्या जीवीचे साकडे
कोण निवारील कोडे कोडे || २ ||

माझ्या अनुसूया सुता
तुका म्हणे पाव आता || ३ ||