पाहताची होती दंग आज सर्व संत
विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत ||धृ||
युगे अठ्ठावीस उभा विठु विटेवरी
धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी
अनाथांच्या नाथ हरी असे कृपावंत ||१||
कुठली ती होती माती कोण तो कुंभार
घडविता उभा राहे पहा विश्वंभर
तिच्यामुळे पंढरपूर झाले किर्तीवंत ||२||
पाहुनिया विटेवरी विठू भगवंत
दत्ता म्हणे मन माझे होई तेथे शांत
गुरुकृपे साधियेला मी आज हा सुपंथ ||३||
No comments:
Post a Comment