Thursday, June 20, 2013

टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग (TAAL BOLE CHIPALILA NAACH MAJHYA SANG)


टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग
देवाजीच्या व्दारी आज रंगला अभंग .... || धृ ||

दरबारी आले रंक आणि राव
झाले एकरूप नाही भेदभाव
गाऊ नाचू सारे या हो, होऊनी नि:संग .... || १ ||

जन सेवेपायी काया झिजवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी
ताल देऊनिया बोलतो मृदुंग .... || २ ||

हरीभजनाचे सुख मी लुटावे
गात गात माझे डोळे मी मिटावे
नका करू कोणी माझ्या समाधीचा भंग .... || ३ ||

ब्रह्मनंदि देह बुडोनिया जाई
एक एक खांब वारकरी होई
कैलासीचा राणा, झाला पांडुरंग .... || ४ ||

चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट (CHANDAN CHANDAN JHALI RAAT, EKVIRECHI PAAHAT HOTE VAAT)


चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट .....

पुण्याचा सोनार बोलवा ग आईला नथनि घडावा ग .....
हळदी ग कुंकवाच घेऊन ताट एकविरीची पाहत होते वाट .....
चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट .....

ठाण्याचा कासार बोलवा ग आईला बांगड्या भरा ग .....
लिंब ग नारळाच घेऊन ताट, एकविरीची पाहत होते वाट .....
चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट .....

रायगड चा लोहार बोलवा ग, आईला त्रिशूल घडावा ग .....
उदो ग कोंबड्याच घेऊन ताट, एकविरीची पाहत होते वाट .....
चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट .....


Tuesday, June 18, 2013

रुपी गुंतले लोचन, पायी स्थिरावले मन (RUPI GUNTALE LOCHAN, PAYI STHIRAVALE MAN)


रुपी गुंतले लोचन, पायी स्थिरावले मन .... || धृ ||

देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला .... || १ ||

देवा काळोनेदी सुखदु:खा, तहान हरपली भूक .... || २ ||

तुका म्हणे नव्हे परती, तुझ्या दर्शने मागुती .... || ३ ||

कानडा राजा पंढरीचा (KANADA RAAJA PANDHARICHA)


कानडा  राजा पंढरीचा
वेदानाही नाही कळला अंत पार यांचा .... || धृ ||

निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रगटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटीवर
पुतळा चैतन्याचा ... || १ ||

परब्रह्म हे भक्तांसाठी
उभे थकले भिमेसाठी
उभा राहिला भाव सांवयव
जणू कि पुंडलिकाचा ... || २ ||

हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबाची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा
वाली दामाजीचा ... || ३ ||

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार (FIRATYA CHAKA VARATI DESI MATILA AAKAR)



फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठल तू वेडा कुंभार ... || धृ ||

माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा
आभाळाच मग ये आकारा
तुझ्या घाटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार ... || १ ||

घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाच्या दैव वेगळेतुझ्या विना हे कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार ... || २ ||

तूच घडविशी तूच फोडीशी कुरवाळसी तू तूच जोडीशी
न कळे यातून काय सांधीशी
देसी डोळे परी निर्मिसी तया पुढे अंधार ... || ३ ||

विठू माऊली तू माऊली जगाची (VITHU MAVULI TU MAVULI JAGACHI)


विठू माऊली तू माऊली जगाची
माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || धृ ||

काय तुझी माया सांगू श्रीरंगा
संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला
अभंगाला जोड टाळ चीपल्याची
माऊलीच मूर्ती विठ्ठलाची ... || १ ||

लेकरांची सेवा केलीस तू आई
आ आ आ लेकरांची सेवा
कस पांग फेडू आता कस उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळूनी जीव माझा सावळे विठ्ठाई
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलाची
माऊलीच मूर्ती विठ्ठलाची ... || २  ||

पांडुरंग पांडुरंग विठू माउली तू 

माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी (MAJHE MAHER PANDHARI, AAHE BHIVARECHYA TIRI)


माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी ... || धृ ||

बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई ... || १ ||

पुंडलिक आहे बंधू, त्याची ख्याती सांगू काय ... || २ ||

माझी बहिण चंद्रभागा, करीसे पापभंगा ... || ३ ||

एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण ... || ४ ||

माझिया बोबडिया बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला (MAJIYA BOBADIYA BOLA, CHITTA DYAVE BA VITHTHALA)


माझिया बोबडिया बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला ... || धृ ||

वारा वाहे भलत्या ठाया, हीच माझी राग छाया ... || १ ||

गाता येईल तैसेची गावे, मुखी हरी हरी म्हणावे ... || २ ||

तन मन नेणु देवा, नामा विनवितो केशवा ... || ३ ||

चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी (CHANDRA BHAGECHYA TIRI UBHA MANDIRI TO PAHA VITHEVARI)


चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी तो पहा विठेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
कधी प्रगटला तो जगजेठी आला पुंडलिकाच्या भेटी
पाहून सेवा घर, थांबला हरी तो पाहे विठेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी || १ ||

नाम देव नामात रंगला, संत तुका कीर्तनी दंगला
टाळ घेउनी तरी, चला वारकरी, तो पहा विटेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी || २ ||

संत जनाई ओवी गाई, विठाई ग विठाई
माझी पंढरीची आई, कशी सखू अन बहिणाबाई
विठाई ग विठाई, माझी पंढरीची आई,
रखुमाई मंदिरी ऐकली परी तो पहा विठेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी || ३ ||

लंबोदर गिरीजा नंदना देवा (LAMBODAR GIRIJA NANDANA DEVA)


लंबोदर गिरीजा नंदना देवा
पूर्ण करी मनोकामना देवा  || धृ ||

हे मन पावन तव पदी सेवन
बुद्धी द्यावी गजानन देवा || १ ||

पायी घागुऱ्या वाजती रुणझुण
नाचत यावे गजानन देवा ... || २ ||

एका जनार्दनी विनवितो तुज
विद्या द्यावी गजनना देवा ... || ३ ||

घातली रांगोळी गुलालाची, स्वारी आली गणरायाचा (GHATALI RANGOLI GULALACHI, SWARI AALI GANARAYACHI)


घातली रांगोळी गुलालाची, स्वारी आली गणरायाचा || धृ ||

दुर्वा पुष्प बहु प्रिय माळा, हार रत्नाचा शोभला .... || १ ||

नैवेघ मोदकाचा केला, प्रसाद वाटुनी काला केला || २ ||

दास म्हणे श्री गणराया, मस्तक हे तुमच्या पाया... || ३ ||

श्री गणेशा शारदा, करीशी गाथना (SHRI GANESHA SHARADA, KARISHI GATHANA)


श्री गणेशा शारदा, करीशी गाथना
आम्ही वारांगणा रमे ऐसा ...... || धृ ||

येथे आम्ही मानवाने वर्णावेते काय
स्वर्गीचे सुरवर बंदिती पाय .... || १ ||

ज्याच्या गायनाने तटस्य शंकर
तयापरी पार नाही तुझे..... || २ ||

तुका म्हणे आम्ही किंकरते किती
इंद्राची मस्ती नागविती .... || ३ ||

अशी चिक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्याची ग (ASHI CHIK MOTYACHI MAAL HOTI G TIS TOLYACHI G)


अशी चिक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग ... || धृ ||

ह्या चिक माळेला रेशमी मऊ दार दोरा ग
मऊ रेशमांच्या दोऱ्यात नारंगी माळ ओविल ग || १ ||

अशी चिक माळेला हिऱ्याचे आठ आठ पदर ग
अशी तीस तोळ्याची माळ गणपतीला घातली ग || २ ||

मोरया गणपतीला फुलून माळ शोभली ग
अशी चिक माळ पाहून, गणपती किती हसला ग || ३ ||

त्याने गोड हसुनी मोठा आशीर्वाद दिला ग
चला चला करूया नमन गणरायाला ग
त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात
शुभ कार्याला ग || ४ ||

ॐ कार प्रधान रूप गणेशाचे (OMKAR PRADHAN RUP GANESHA CHE)


कार प्रधान रूप गणेशाचे
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ..... || धृ ||

अकार तो ब्रम्हा उकार तो विष्णू
मकार महेश जाणियेला  || १ ||

ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न
तो हा गजानन मायबाप ..... || २ ||

तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी
पहावी पुराणी व्यासाचीया ..... || ३ ||

हे शिवशंकर गिरीजा तनया गणनायका प्रभूवरा (HE SHIV SHANKAR GIRIJA TANAYA GANAYAKA PRABHUVARA)


हे शिवशंकर गिरीजा तनया गणनायका प्रभूवरा
शुभ कार्याच्या शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा || धृ ||

प्रसन्न होऊनी विघ्न हरावे
नम्र कलेचे सार्थक व्हावे
तुझ्या कृपेने यश कीर्तीचा बहर येऊ दे भरा || १ ||

वंदन करुनी तुजला देवा
रसिक जनाची करितो सेवा
कौतुक होऊनी आम्हा मिळावा सन्मानाचा तुरा
हे शिवशंकर गिरीजा तनया || २ || 

तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथा (TUCH SUKH KARTA TUCH DUKH HARTA AVAGHYA DINACHYA NATHA)


तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा || धृ ||

पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्चाने एकदा हर्ष
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्श
पुऱ्या वर्षाची साऱ्या दुखाची, वाचावी कशी हि गाथा || १ ||

पहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ,
गुळ फुटणे खोबर नि केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ,
करी भक्षण आणि रक्षण, तूच पिता तूच माता... || २ ||

नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील का रे सुखाचे
सेवा जाणून गोड मानून घ्यावा आशीर्वाद आता..... || ३ || 

प्रथम तुला वंदितो कृपाळा (PRATHAM TULA VANDITO KRUPALA)


प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया || धृ ||

विघ्नविनाशक, गुणीजन पालक
दुरित तीमिर हार का, सुखकारक तू दु:ख विदारक
तूच तुझ्या सारखा, वक्रतुंड ब्रम्हांड नायका
विनायक प्रभुराया ..... || १ ||

सिद्धीविनायक तूच अनंता
शिवात्मजा मंगला, शेंदूर वदना विद्याधीशा
गणाधिपा वत्सला, तूच ईश्वरा साह्य करावे,
हा भव सिंधू तराया.... || २ ||

गजवदना तव रुप मनोहर
शुक्लांबर शिवसुता, चिंतामणी तू अष्टविनायक,
सकळांची देवता रिद्धी सिद्धीच्या वर दयाळा
देईकृपेची छाया.... || ३ ||

गजानना गजानना गणराया (GAJANANA GAJANANA GANARAYA)


गजानना गजानना गणराया
मुखाने गाऊ या मोरया....  || धृ ||

फळे फुले वाहू या पूजन करू या
लाडू मोदकांचा नैवेद दावूया
भक्ती भावाने गणेशाला वंदूया, मुखाने .... || १ ||

हे मोरेश्वरा हे विघ्नहरा
गुण किती वर्णू तुझे लंबोदरा
चौदा विघेचा देवा असे तू पाथा, मुखाने ..... || २ ||

देव देवतांच्या हे महाराजा
नाम तुझे राहो सदा मुखी माझ्या
सारे मिळून गणपतीचा घोष करूया, मुखाने.... || ३ ||

हा देवांचा देव गणपती सर्वाहुनी वेगळा (HA DEVANCHA DEV GANAPATI SARVAHUNI VEGALA)


हा देवांचा देव गणपती सर्वाहुनी वेगळा
वाहतो दुर्वाकुर कोवळा..... || धृ ||

सिद्धी विनायक तू हेरंबा, मंगल दायक तू आरंभ
चिंतामणी तू जय सुख दाता, विषाल देही वैराग्याच्या
रंग तुझा सोवळा ...... || १ ||

पशाकुंश करी विघ्नहरया, उभय करावी देशी अभया
अन्न ब्रम्ह परी मोदक माया, तुझ्या कृपेने मुका बोलतो
चालतसे पांगळा ..... || २ ||

गजमस्तक तू असीम बुद्धी, रिद्धी सिद्धीची समृद्धी
साहित्याची अमृत सिद्धी, प्रथम पाठीवर तुझा गणेशा
कार गिरविला .... || ३ ||

ॐ कार स्वरूपा सद्गुरू समर्था (OMKAR SWARUPA SADAGURU SAMRTHA)


कार स्वरूपा सद्गुरू समर्था
अनाथांच्या नाथा तुझ नमो..... || धृ ||

नमो मायबापा गुरुकृपाधना, तोडीया बंधना मायामोहा
मोहजाळ माझे कोण नीरशील
तुझविण दयाळा सद्गुरुराया..... || १  ||

सद्गुरुराया माझा आनंदसागर, त्रैलोक्य आधार गुरुराव
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश
ज्यापुढे उदास चंद्ररवी, रवी, शशी, अग्नी, नेणती रूप
स्वप्रकाश रुपा नेणे वेद.... || २ ||


एका जनार्दनी गुरुपरब्रम्, तयाचे पै सदामुखी || ३ ||

Thursday, June 13, 2013

तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन (TULA KHANDYAVAR GHEIN, TULA PALKHIT MIRVIN)


तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन
साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन || धृ ||

पायी चालत नेले या श्रद्धा सबुरीवाल्यान
साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान || १ ||

वाट असेती वळणाची आले पायाला ते फोड
तुझ्या कृपेच्या छायेत, फोड वाटती गोड || २ ||

माझी बाप आणि आई तुच विठ्ठल रखुमाई
तुझ्या शिर्डी नगरात मी पंढरी पाहीन || ३ ||

पायी चालत येईन सुख दु:ख मी सांगीन
साई बाबा माझे साई ते दु:ख निवारील || ४ || 

Monday, June 10, 2013

हे भॊळ्या शंकरा (HE BHOLYA SHANKARA)


हे भॊळ्या शंकरा  – २ 
आवड तुला बेलाची – २ 
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा  …. शंकरा
हे भॊळ्या शंकरा ….. महादेवा
हे भॊळ्या शंकरा  ….. हे भॊळ्या शंकरा
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा – २ 
आवड तुला बेलाची – २ 
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा

गळ्या मधे रुद्राक्षान्चा माळा,  लाविलेते भस्म कपाळा
गळ्या मधे रुद्राक्षान्चा माळा,  लाविलेते भस्म कपाळा
आवड तुला बेलाची – २ 
बेलाच्या पानाची

त्रिशूल डमरू हाथी,  संगे नाचे पार्वती …. हॊ – २ 
त्रिशूल डमरू हाथी,  संगे नाचे पार्वती – २ 
आवड तुला बेलाची – २ 
बेलाच्या पानाची

भॊळेनाथा आलॊ तुझ्या दारी,  कुठे हि दिसे ना पुजारी …. हॊ – २ 
भॊळेनाथा आलॊ तुझ्या दारी,  कुठे हि दिसे ना पुजारी – २ 
आवड तुला बेलाची – २ 
बेलाच्या पानाची

Thursday, June 6, 2013

आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबा (AAI G AMBE MAATE THUJHA SONIYA JHUBA, TUJHYA G DARSHANALA RAJA KOLHAPURACHA UBHA)


आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबा
तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा || धृ ||

कोल्हापूरचा राजा राजा फिरतो जत्रेत
फिरतो जत्रेत फुले पडती पदरात... आई || १ ||

आई ग अंबे माते केस सोनियाच्या तारा
केस सोनियाच्या तारा वैरी कापे थरथरा.... आई || २ ||

ढोल वाले दादा ढोल वाजव जोरात
ढोल वाजव जोरात आई हसते गालात.... आई || ३ ||

टाळ वाले दादा टाळ वाजव जोमान
टाळ वाजव जोमान अंग भिजल घामान.... आई || ४ ||