नाम घेता तुझे गोविंदा, मनी वाहे भरुनी आनंद || धृ ||
ऋषीकेशी बन्सी बिहारी || गोकुळीचा कुंजविहारी ||
कुणी म्हणती कृष्ण मुरारी | कुणी मिलिंद आणि मुकुंद || १ ||
विश्वाचा नाथ म्हणोनी | हसते विश्व तव वदनी |
तव नामे तुझिया चरणी | वाहते यमुना जल धुंद || २ ||
तू शब्द ओळी ओळीत | तू अर्थ मधुर गीतेत |
तू ताल भक्तिगीतात | तू सुरासुरास सुगंध || ३ ||
No comments:
Post a Comment