Friday, March 29, 2013

आवडीने भावे हरिनाम घेसी (AAVADINE BHAVE HARINAM GHESI)


आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे || १ ||

नको करू खेद कोणत्या गोष्टीचा | पती लक्ष्मीचा जाणतसे || २ ||

सकळ जीवांचा करितो सांभाळ | तुज मोकलिल ऐसे नाही || ३ ||

जैसी स्थिती आहे तैशापरी राहे | कौतुक तू पाहे संचिताचे || ४ ||

एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा | हरिकृपे त्याचा नाश झाला || ५ ||

पंढरीचा विठ्ठल कोणी पहिला (PANDHARICHA VITHTHAL KONI PAHILA)



पंढरीचा विठ्ठल कोणी पहिला
उभा कसा राहिला विठेवरी ||धृ||

अंगी शोभे पितांबर पिवळा
गळया मध्ये वैजयंती माळा
चंदनाचा टिळा माथे शोभला ||१||

चला चला पंढरीला जावू
डोळे भरुनी विठू माऊलीला पाहू
भक्ती मार्ग त्याने आम्हा दाविला ||२||

ठेवोनिया दोन्ही कर कटी
तोह मुकुंद वाळवंटी
हरी नामाचा झेंडा तेथे लाविला ||३||

बाळ श्रावण रात्री आला
नको दूर लोटू पंढरीला
तव चरणी हा देह सारा वाहिला ||४|| 

विठ्ठल नामाची शाळा भरली (VITHTHAL NAMACHI SHALA BHARALI)



विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान-भूक हरली ||धृ||

हेची घडो मज जन्माजन्मांतरी
मागणे श्री हरी नाही दुजे || १ ||

मुखी नाम सदा संताचे दर्शन
जनी जनार्दन ऐसा भाव || २ ||

नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी
कीर्तन गजरी सप्रेमाचे || ३ ||

भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी (BHAKTI VACHUN MUKTICHI MAJ JADALI RE VYADHI)



भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी
विठ्ठल मीच खरा अपराधी || धृ ||

ज्ञानेशाचे अमृत अनुभव, अनुकम्पेचे नेत्री आसव
स्वप्न तरल ते नकळ शैषव, विले त्यांत कधी विठ्ठला || १ ||

संत तुक्याची अभंगवाणी, इंद्रायणीचे निर्मळ पाणी
मीच बुडविला दृष्ट यौवनी, करुणेचा हा निधी विठ्ठला || २ ||

सरले शिश्नाव स्वच्छंदीपण, नुरले यौवन उरले मी पण
परी न रंगले प्रमप्त हे मन, तुझ्या चिंतनी कधी विठ्ठला || ३ ||

Saturday, March 23, 2013

विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा (VITHTHAL PAHUNA AALA MAJHYA GHARA)



विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
लिंब लोन करा सावळ्याला ||धृ||

दूरच्या भेटीला बहु आवडीचा
जीवन सरिता नारायण ||१||

सर्व माझे गोत्र, मिळाले पंढरी
मी माझ्या माहेरी धन्य झालो ||२||

तुका म्हणे माझा आला सखा हरी
संकट निवारी पांडुरंग ||३|| 

ज्या सुखा कारणे देव वेडावला, (JYA SUKHA KARANE DEV VEDAVALA)



ज्या सुखा कारणे देव वेडावला,
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला || धृ ||

धन्य धन्य संताचे सदन
तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण || १ ||

नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण नारायण नारायण

सर्व सुखाची सुखराशी, संत चरणी भक्ती मुक्ती दासी
एका जनार्दनी पार नाही सुखा,
म्हणोनी देव भुलले देखा || २ ||

विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत (PAHATACHI HOTI DANG AAJ SARV SANT, VITHTHALACHYA PAYI VIT JHALI BHAGHYAVANT)


पाहताची होती दंग आज सर्व संत
विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत ||धृ||

युगे अठ्ठावीस उभा विठु विटेवरी
धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी
अनाथांच्या नाथ हरी असे कृपावंत ||१||

कुठली ती होती माती कोण तो कुंभार
घडविता उभा राहे पहा विश्वंभर
तिच्यामुळे पंढरपूर झाले किर्तीवंत ||२||

पाहुनिया विटेवरी विठू भगवंत
दत्ता म्हणे मन माझे होई तेथे शांत
गुरुकृपे साधियेला मी आज हा सुपंथ ||३||

कारे देवा उशीर पारकेला (KA RE DEVA USHIR PAAR KELA, TUJHYA SATHI JIV MAJHA JADALA)



कारे देवा उशीर पारकेला
तुझ्या साठी जीव माझा जडला || धृ ||

तुझ्यासाठी सोडीला घरदार मोडीला संसार जीव माझा जडला || १ ||

तुझ्यासाठी होईन भिकारी करीन तुझी वारी जीव माझा जडला || २ ||

तुझ्या साठी राहीन उपवासी करीन एकादसी जीव माझा जडला || ३ ||

जनी मनी होईन तुझी दासी येईन चरणासी जीव माझा जडला || ४ ||

बसून कसा राहीला दगडावरी (BASUN KASA RAHILA DAGADAVARI)




बसून कसा राहीला दगडावरी
बसून कसा राहीला दगडावरी
बसून कसा राहीला
शीरडीचा साई कोणी पाहिला
बसून कसा राहीला दगडावरी

लिंबाखाली प्रगट झाला
साईरूपी भगवान तो आला
भगवा झेंडा साईने तिथे रोविला

चला चला शीरडीला जावू
डोळे भरुनी साईला पाहू
साई चरणी देह माझा सारा वाहिला

मन माझे आनंदी नाचे
साई साई बोल माझे वाचे
भक्ती मार्ग आम्हाला त्यांनी दाविला

आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (AAMHI BIGHADALO TUMHI BI GHADANA)



आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना

चंदनाच्या संगे पोरी बी घडल्या
पोरी बी घडल्या चंदनमय झाल्या

सागराच्या संगे नदी बी घडली
नदी बी घडली सागरमय झाली

परिसाच्या संगे लोहे बी घडले
लोहे बी घडले सुवर्णमय झाले

विठ्ठलाच्या संगे तुका बि घडला
तुका बी घडला विठ्ठलमय झाला

सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलांचे नाम आधी (SAKAL MAGAL NIDHI, SHRI VITHTHALACHE NAAM AADHI)


सकळ मंगळ निधी,
श्री विठ्ठलांचे नाम आधी || धृ ||

म्हण कां रे म्हण कां रे जना
श्री विठ्ठलाचे नाम वाचे || १ ||

पतित पावन साचे
श्री विठ्ठलाचे नाम वाचे || २ ||

बापरखुमादेवीवरु साचे
श्री विठ्ठलाचे नाम वाचे || ३ ||

माझे माहेर पंढरी | आहे भिवरेचे तिरी || (MAJHE MAHER PANDHARI | AAHE BHIVARICHYA TIRI)



माझे माहेर पंढरी | आहे भिवरेचे  तिरी ||

बाप आणि आई | माझी विठ्ठल रखुमाई ||

पुंडलिक आहे बंधू | त्याची ख्याती काय सांगू ||

माझी बहिण चंद्रभागा | करीत असे पापभंगा ||

एकाजनार्दनी शरण | करी माहेराची आठवण ||

देव एका पायाने लंगडा (ASA KASA BAI DEVACHA DEV THAKADA , DEV EKA PAYANE LANGADA)



असा कसा ग बाई
देवाचा देव ठकडा
देव एका पायाने लंगडा ||धृ||

गवळ्या घरी जातो | दही दुध खातो
करी दहया दुधाचा रबडा ||१||

शिंकेचि तोडीतो मडकेची फोडीतो |
पाडी नवनिताचा सडा ||२||

वाळवंटी जातो कीर्तन करितो
लावी साधुसंतांचा झगडा ||३||

एका जनार्दनी | भिक्षा वाढ मायी
देव एकनाथाचा बछडा ||४||

नमन माझे गुरुराया | महाराजा दत्तात्रया || धृ || (NAMAN MAJHE GURU RAYA | MAHA RAJA DATTATRAYA)



नमन माझे गुरुराया |
महाराजा दत्तात्रया || धृ ||

तुझी अवधूत मूर्ती
माझ्या जीवीची विश्रांती || १ ||

माझ्या जीवीचे साकडे
कोण निवारील कोडे कोडे || २ ||

माझ्या अनुसूया सुता
तुका म्हणे पाव आता || ३ ||

नको वाजवू श्री हरी मुरली (NAKO VAJAVU SHRI HARI MURALI)




नको वाजवू श्री हरी मुरली
तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे ||धृ||

घरी करीत होते मी कामधंदा
तेथे मी गडबडली रे || १ ||

घागर घेवूनी पानियाशी जाता
दोही वर घागर पाजरली || २ ||

एका जनार्दनी पूर्ण कृपेने
राधा गवळण घाबरली || ३ ||